(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात लावणी करुन कृती कार्यक्रम संपन्न केला. कृषी विषयक आवड आणि श्रमप्रतिष्ठा तसेच शेती विषयक अभिरुची निर्माण व्हावी या हेतूने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्याची एक कृती म्हणून भात शेती लावणी हा प्राथमिक उपक्रम हाती घेण्यात आला.
सदर उपक्रमामध्ये २० विद्यार्थ्यांचा सहभाग होता या उपक्रमाला संस्थेचे सचिल श्री. रोहित मयेकर, संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.स्नेहा पालये, उपप्राचार्य श्री. गणेश कुळकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख अवनी नागले, तसेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रमुख तेजश्री रेवाळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.