(नवी दिल्ली)
पोस्टमधील बचत योजना, पीपीएफ सारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर असतात. या बचतीमध्ये पुंजी गुंतवणाऱ्या मध्यम वर्गीयांसाठी केंद्र सरकार २०२३ साली मोठी भेट देणार आहे. अर्थमंत्रालयाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
छोट्या बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ही खूशखबर आहे. अर्थ मंत्रालयाने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्चपर्यंत वरील बचत योजनाच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अर्थ मंत्रालयाने जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी व्याजदराची घोषणा केली आहे. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही. पब्लिक प्रॉविडेंट फंड वर 7.1 टक्के, सुकन्या समृद्ध योजना वर 7.6 टक्के व्याज मिळत आहे.