(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा व तालुकाध्यक्षांची नुकतीच निवड करण्यात आली, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाचे पालन करून भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश प्रमुख माननीय अशोक कांबळे यांचा प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यामध्ये रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार यांची संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच तालुकाध्यक्ष पदी विशाल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी अनेक बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भरत सावंत,चंद्रकांत जाधव,महेंद्र पवार,दिनेश कांबळे, किरण पवार, अजित कांबळे, दिलीप पाटील, नंदकुमार सावंत, यांसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रदीप पवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होताच रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक समाज बांधव अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.
भीम आर्मी एक सामाजिक संघटना असून कोणावर अन्याय अत्याचार झाल्यास या संघटनेकडून तातडीने दखल घेऊन पिडीतांना न्याय देण्यासाठी हजर असते. रत्नागिरीत प्रदीप पवार यांच्यासारख्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.