(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर खाडीत शनिवारी सकाळी तरूणाचा मृतदेह आढळून आला. विलास रूपाजी मास्कर (रा. मासू ता. गुहागर) असे मृताचे नाव आहे. स्थानिक मच्छिमारांना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खाडीच्या तळाशी विलास याचा मृतदेह मिळून आला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार विलास याने १ एप्रिल रोजी बोटीवर झोपण्यासाठी जात असल्याचे आपल्या खलाशी मित्रांना सांगितले होते. यानंतर तो बेपत्ता झाला होता. दरम्यान खाडीच्या पाण्यामध्ये शोध घेण्यात आला असता विलास याचा मृतदेह पाण्याच्या तळाशी असल्याचे दिसून आले. या घटनेची खबर सुनिल तुकाराम पोमेंडकर (रा. कासारवेली, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत दिली.