(मुंबई)
अनेक वेळा आपल्याला कोणीतरी फाटकी नोट दिल्याचं लक्षात येतं, मात्र ही गोष्ट आपल्या लक्षात येईपर्यंत बराच वेळ फार उशीर होतो. मग आपला त्या फाटक्या नोटेसोबतचा संघर्ष आणि प्रवास सुरु होतो कारण, अशी फाटकी नोट कुणीही घेण्यास तयार नसतो. दुकानदार असो किंवा रिक्षाचालक थोडी नोट फाटकी जरी दिसली, तरी अशी नोट घेण्यास ते सरळ नकार देतात. अशा वेळी आपल्याला नोट बदलून मिळण्याची चिंता असते. पण तुमच्यासोबतही असं काही घडलं असेल आणि तुम्हाला फाटकी किंवा अर्धी नोट बदलायची असेल, तर ते शक्य आहे. फाटकी किंवा अर्धी नोट तुम्ही बँकेमध्ये जाऊन बदलून घेऊ शकता.
तुम्ही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्राँचमध्ये जाऊन तुमच्याकडे असलेली फाटकी किंवा अर्धी नोट बदलून घेऊ शकता. जर कोणतीही बँक तुम्हाला नोट बदलून देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्या बँकेविरोधात तक्रार करु शकता. यानंतर संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे ५, १०, २० किंवा ५० रुपयांच्या कमी किमतीची फाटलेली नोट असेल तर तुमच्याकडे अशा नोटेची किमान अर्धी नोट असणे आवश्यक आहे. जर तुमच्या २० रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील अर्धी नोट म्हणजे सुमारे ५० टक्के सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असेल तर, त्या बदल्यात तुम्हाला २० रुपयांची नोट बदलून मिळेल.
तर शुल्क भरावा लागणार
जर फाटलेल्या नोटेची संख्या २० रुपयांपेक्षा जास्त असेल तर, जास्त किमतीच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. नोटा बदलण्याबाबतचा सोपा नियम असा आहे की, नोटेवर गांधीजींचा फोटो किंवा वॉटरमार्क, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी आणि अनुक्रमांक या खुणा सुरक्षित असतील, तर अशी नोट तुम्हाला बदलून मिळू शकते. बँका तुम्हाला अशा नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाही.
‘या’ नोटा बदलून मिळणार नाहीत
आरबीआयच्या नियमानुसार, जर तुम्हाला बनावट नोट मिळाली असेल तर ती नोट नक्की बदलून मिळेल. जुन्या आणि फाटलेल्या किंचित नोटा सहज बदलता येतात. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, जर तुमची नोट जळाली असेल किंवा त्याचे खूप तुकडे असतील तर ती नोट बदलली जाणार नाही. तुम्ही नोटा जाणूनबुजून कापल्या किंवा फाडल्या असे बँकेच्या अधिका-यांना वाटले तर अशा परिस्थितीतही तुम्हाला नोट बदलून मिळणार नाही. फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला किती पैसे परत मिळतील हे नोट किती फाटली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे यावर अवलंबून आहे.