(रत्नागिरी)
शहरानजीच्या फणसोप सडा येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सर्वेश विश्वनाथ माळी ( १७ , सध्या रा . फणसोपसडा , रत्नागिरी, मूळ रा . देऊळवाडी – हर्चे , ता.लांजा ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे . सर्वेश हा मानसिक रुग्ण होता . फणसोप सडा येथे मामाच्या घरी असताना त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्वेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले . या प्रकरणी सर्वेशचे वडील विश्वनाथ सखाराम माळी ( ४० , रा . देऊळवाडी हर्चे , ता. लांजा ) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .