- पोटात अल्सर : जेवण केल्याच्या १ किंवा २ तासांनंतर किंवा रात्रीच्या वेळी पोटाच्या वरच्या भागात किंवा मधोमध जळजळ होत असेल, तर हा अल्सरचा संकेत असू शकतो.
- उलट्या होणे : वारंवार उलट्या होणे किंवा मळमळणे पोटाच्या अल्सरचा संकेत असू शकतो.
- पोट फुगणे : पोट फुगण्याची समस्या हा अल्सरचा संकेत असू शकतो.
- स्टूल(संडास)चा रंग : दीर्घकाळापासून डार्क किंवा काळ्या रंगाच्या स्टूलची समस्या असेल, तर इग्नोर करू नका. अल्सरमध्ये होणाऱ्या ब्लीडिंगमुळे असे होऊ शकते.
- छातीत जळजळ : पोटातील अॅसिड वरच्या बाजूला अन्ननलिकेमध्ये येते. यामुळे छातीच्या आजूबाजूला तीव्र जळजळ होते. हा अल्सरचा संकेत असू शकतो.
- उलट्यांमधून रक्त : उलट्यांमध्ये थोडेसे रक्त येणे अल्सरचा संकेत असू शकतो.
- वजन कमी होणे : आहारात काहीही बदल न करता अचानक वजन कमी झाले, तर हा अल्सरचा संकेत असू शकतो.
- पोटात टोचणे : जेवणाच्या १ किंवा २ तासांनंतर किंवा रात्री असे वाटते की, पोटात काही तरी टोचत आहे. असे असल्यास अल्सरचा संकेत असू शकतो.
- तीव्र पोटदुखी : सतत पोटात वेदना होणे किंवा काही खाल्ल्यानंतर पोटात तीव्र वेदना सुरू होणे अल्सरचा संकेत असू शकतो.
- लवकर भूक लागणे : विनाकारण वारंवार भूक लागणे हा अल्सरचा संकेत असू शकतो. पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे असा प्रकारही होऊ शकतो.
अल्सरची कारणे
‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.
वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.
धूम्रपान व मद्यपान
सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे
अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण जास्त सापडतात.