( चिपळूण )
तालुक्यातील खेर्डी येथे एका तरुणाला पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची घटना ५ मार्च ते १० मार्च २०२३ दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद निखिल शिंदे (३०, नोकरी, गूळ शिरगाव, चिपळूण, सध्या खेड चिपळूण) याने पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गॅरी वॉशिंग्टन आणि अंकुर या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या गाहितीनुसार निखिल शिंदे याला मोबाईलवर ५ मार्च ते १० मार्च दरम्यान पार्टटाईम जॉब करून पैसे कमवा असे सांगितले, यासाठी वेळोवेळी बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगून १३ लाख १५ ५३४ रुपयांची फसवणूक केली. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला नोकरी मिळत नाही याची खात्री पटल्यावर आपली फसवणूक झाली आहे असे निखिल याच्या लक्षात आले. त्याने चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार गॅरी वॉशिंग्टन आणि अंकुर या दोघांवर भादविकलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.