(पालेकेले)
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. कँडी येथील पालेकेले स्टेडियमच्या रणभूमीवर आज भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील महाद्वंद्व पाहण्यासाठी अवघे क्रीडा विश्व सज्ज झाले आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात जेव्हा उभय संघ आमनेसामने येतील, तेव्हा साहजिकच देशवासीयांच्या नजरा या लढतीकडे वळतील. प्रामुख्याने भारताची आघाडीची फळी विरुद्ध पाकिस्तानचा वेगवान मारा यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासाठी क्रीडारसिक आतुर आहेत. मात्र वरुणराजा या लढतीत चाहत्यांचा हिरमोड करण्याची दाट शक्यता आहे.
श्रीलंकेत ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे या कालावधीत श्रीलंकेत स्पर्धाचं आयोजन केलं जात नाही. मात्र भारताने पाकिस्तान सामने खेळण्यास नकार दिल्याने या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सामना होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामन्यात हजेरी लावली तर कसं असेल गणित? जाणून घ्या. असं झालं तरच डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जाईल. उरलेली षटकं आणि विकेटच्या आधारावर गणना केली जाते. दुसऱ्या डावात फलंदाजी वेळी पावसाने व्यत्यय आणला किंवा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने टाकावयाच्या षटकांच्या संख्येच्या टक्केवारीने गुणाकार केला जातो. पावसामुळे सामना झालाच नाही तर यासाठी कोणताही दिवस राखीव ठेवलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. यासह पाकिस्तान सुपर 4 मध्ये एन्ट्री मारेल. तर भारताला 4 सप्टेंबर रोजी नेपाळला पराभूत करावं लागणार आहे. टीम इंडियाने पल्लेकेल येथे आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात विजयी आव्हान दिलं होतं. तर दोन सामन्यात विजयी आव्हान गाठलं होतं. त्यामुळे हे मैदान भारतासाठी लकी आहे, असंच म्हणणे योग्य आहे.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान, सलमान अघा, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, हॅरीस रौफ, शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफिक, उसामा मीर, मोहम्मद हॅरीस, फहीम अशरफ, मोहम्मद वासिम, सौद शकील, तय्यब ताहिर.
रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ, नसीम शाह या पाकिस्तानी त्रिकुटाच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. विशेषत: डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासमोर भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. २०२१च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान माऱ्यासमोर भारताची भंबेरी उडाली होती. मात्र २०२२मध्ये भारताने त्यांच्यावर काहीसे वर्चस्व मिळवले. गेल्या टी-२० विश्वचषकात कोहलीने हॅरीस रौफला सरळ लगावलेला षटकार चाहत्यांना आजही स्मरणात आहे. आता एकदिवसीय प्रकारात ४ वर्षांनी उभय संघ आमनेसामने येणार आहेत.
एकदिवसीय प्रकारात
एकूण सामने : १३२
भारत विजयी : ५५
पाकिस्तान विजयी : ७३
टाय/रद्द : ४
२२-१७
भारतासाठी २०२३ या वर्षातील एकदिवसीय सामन्यांत कुलदीपने सर्वाधिक २२ बळी मिळवले आहेत, तर पाकिस्तानकडून हॅरीस रौफने यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक १७ बळी मिळवले आहेत.
७५०
भारतसाठी २०२३ या वर्षात एकदिवसीय प्रकारात शुभमन गिलने सर्वाधिक ७५० धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून बाबर आझमने ६८९ धावा केल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे शेवटचे ५ वनडे
वर्ष परिणाम फरक स्पर्धा
2017 भारत जिंकला 124 धावा चॅम्पियन्स ट्रॉफी
2017 पाक जिंकला 180 धावा चॅम्पियन्स ट्रॉफी
2018 भारत जिंकला 8 विकेट्स आशिया कप
2018 भारत जिंकला 9 विकेट्स आशिया कप
2019 भारत जिंकला 89 धावा विश्वचषक