( जीवन साधना )
आपण अनेकांच्या पायात किंवा कमरेला काळे धागे बांधलेले पाहिले असतील. त्यामुळे मनात प्रश्न पडतो की या काळ्या धाग्याचे रहस्य काय आहे. लोक हातात किंवा पायात काळे धागे का बांधतात? आणि त्याचे वैज्ञानिक रहस्य खरच काय आहे का… असे अनेक प्रश्न आपल्याला हा प्रकार बघताना आपल्याला पडतात. यावर असे मानले जाते की काळा धागा एकीकडे वाईट नजरेपासून पासून संरक्षण करतो, तर दुसरीकडे आपले नशीब देखील बदलू शकते.
काळा धागा शरीरातील कोणतीही ऊर्जा शोषून आणि सोडू देत नाही. आपलं शरीर पंचतत्वापासून बनलं आहे. म्हणजेच आपले शरीर पाच घटकांच्या ऊर्जेने चालते. ज्यामध्ये पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यांचा समावेश आहे. यातून मिळणारी ऊर्जा शरीराला शक्ती देते. सूर्याच्या किरणांमध्ये अशी भरपूर ऊर्जा असते जी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते. तेव्हा या पंचतत्वापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहचत नाही. यामुळे शरीरावर काळा धागा बांधला जातो. काळा रंग हा उष्णता शोषणारा असल्याने काळ्या रंगाचा धागा बांधून तो सूर्याच्या किरणांमध्ये असलेली सर्व ऊर्जा शोषून आपल्या शरीरात पोहोचवतो. ज्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात आणि शरीरातील अनेक आजारही दूर होतात. काही लोकं काळ्या धाग्यात देवाचं लॉकेट देखील घालतात. ज्यामागे त्यांची धार्मिक भावना असते. काळा रंग उष्मा शोषक असतो. काळा धागा वाईट नजर असो किंवा नकारात्मक ऊर्जा दोघांना शोषून घेतो. यामुळे त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही.
वैज्ञानिकदृष्ट्याही काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत आणि हे तथ्य वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांच्या हाताला किंवा पायाला आणि कमरेला काळा धागा बांधल्याने त्यांना आजार होत नाहीत, असाही समज आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी काळा धागा बांधण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जर तुम्ही काळ्या धाग्याला बांधले तर तुम्ही शनिदेवाचा वाईट प्रभाव टाळू शकता आणि तुमच्यावर शनिदेवाची कृपा होईल असा ठाम समज लोकांमध्ये असतो. लोक अनेक प्रकारे काळा धागा वापरतात. काही लोक पायात काळा दोरा बांधतात, काही लोक हाताच्या मनगटात आणि कमरेला बांधतात, तर काही लोक काळ्या दोऱ्याचा हार घालून गळ्यात घालतात.
काळा धागा बांधल्यामुळे धनलाभ होतो असा दावा अनेकजण करतात. तुम्ही तुमच्या उजव्या पायात मंगळवारी काळा धागा बांधल्यास धनलाभ होतो. तसेच तुमच्या जीवनातील पैशांसंबंधीची समस्या दूर होते. काही लोकं फॅशन म्हणून तर काही लोकं नकारात्मक आणि वाईट शक्तीपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाच्या धाग्याचा उपयोग करतात. काळ्या रंगाचा धागा वापरण्यावरून लोकांच्या मनात बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत. पण कोणताही मार्ग असो, सर्वांना फायदा होऊ शकतो आणि आकर्षक दिसण्याचे ते एक कारणही बनते.