रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युवासेना प्रमुख, शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नाम. आदित्य ठाकरे ह्यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील एम सी सी आय ए संस्थेकडून प्राप्त झालेल्या १०० ऑक्सिजन काँसिंट्रेटर्सपैकी १० ऑक्सिजन काँसिंट्रेटर्स राजापूर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी प्रदान करण्यात आले. यामुळे राजापूर तालुक्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.
शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायकजी राऊत व शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना उदयजी सामंत तसेच राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे ह्यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष जमीर खलिफे, गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी निखिल परांजपे व मान्यवर उपस्थित होते.