स्वार्म ड्रोन्सच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणारे 300 एमएमचे शस्त्र नौदलाने विकसित केले आहे. युद्धनौकेच्या सभोवताली सुरक्षा कवच निर्माण करण्याची क्षमता या शस्त्रात असून, ते स्वार्म ड्रोन्सचा फडशा पाडू शकते. हे शस्त्र 300 स्टील बॉल्स सोडते आणि या माध्यमातून एकाच वेळी कित्येक ड्रोन्सला लक्ष्य करणे शक्य असल्याची माहिती कमांडर एम. एन. पाशा यांनी दिली. एके-630 शस्त्र यंत्रणेतून स्टील बॉल्स डागले जातात. स्वार्म ड्रोनच्या विरोधात या शस्त्राची कामगिरी अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले. याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
दिल्लीत ‘स्वावलंबन-2023’
ज्या वेळी मोठ्या प्रमाणात लहान-मोठे ड्रोन एकाच वेळी हल्ला करतात, तेव्हा त्याला स्वार्म ड्रोन्स म्हटले जाते. दिल्लीतील भारत मंडपम् येथे Indian Navy भारतीय नौदल ‘स्वावलंबन-2023’ आयोजित केले आहे. यात नौदलाच्या डोनाम काऊंटर ड्रोन सिस्टिम प्रदर्शित करण्यात आली. ड्रोन्सची संचार व्यवस्था जाम करण्याचे वैशिष्ट्य या यंत्रणेत आहे. ही यंत्रणा पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आली. या शस्त्रास्त्र यंत्रणेने 2021 मध्ये झालेली आयडीएक्स ही शस्त्रास्त्र स्पर्धा जिंकली आहे.