( रत्नागिरी )
मागील काही कालावधी पासून स्टेरोईड घेऊन शरीर बनवण्याचा प्रकार वाढीला लागला आहे. हे समाधान क्षणिक असेल तरी याचा तोटा आयुष्यभर स्पर्धकाला सहन करावा लागतो. हा धोका टाळण्यासाठी असोसिएशनने कड्क पाऊले उचलायला हवी असे स्पष्ट मत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ना. सामंत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठ संघटनेचे संस्थापक रमेश चव्हाण, महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे कार्याध्यक्ष सदानंद जोशी, सचिव गिरीश शेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, डॉ.संघमित्रा फुले, मुख्याधिकारी तुषार बाबर, आरटीओ वाहन निरीक्षक सोहेल ओव्हाळ, विजय खेडेकर, रोशनभाई फाळके, राहुल पंडित, फ़िनोलेक्सचे टी. एस. काकडे, उद्योजक सौरभ मलुष्टे, हेमंत वणजू, क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद दळवी, मुकेश गुंदेचा, आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ना. सामंत यांनी सध्याच्या फिटनेस बाबत परखड मत व्यक्त केले.
बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील स्पर्धकांनी नैसर्गिकरित्या व्यायामाच्या जोरावर आपले शरीर कमवणे ही काळाची गरज आहे. अनैसर्गिकरित्या शरीर कमवण्याचे दुष्परिणाम आपल्याला कालांतराने भोगावे लागतात. महाराष्ट्र असोसिएशनने देखील नैसर्गिकरित्या शरीर कमावण्याबाबत स्पर्धकांचे प्रबोधन करून महाराष्ट्रात नवा पायंडा पाडवा, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रशांत पवार, नियोजन समिती अध्यक्ष आनंद तापेकर, राजेश शेळके, जमीर खलफे, प्रणिल पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जान्हवी पाटील तर आभारप्रदर्शन मुश्ताक खान यांनी केले.