(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकणातील फळांचा राजा असलेला हापूस आंबा यंदा आता अनेक ठिकाणी दिसून येत असतानाच रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील प्रगतशील शेतकरी उल्हास पिंपुटकर यांच्या आंबा बागेत अवघ्या एक वर्षाच्या झाडावर रत्नागिरी हापूस लगडला आहे. ही किमया वरची निवेंडी येथील प्रगतीशील कष्टाळू शेतकरी उल्हास पिंपुटकर यांनी आपल्या अपार मेहनत व चाणाक्ष बुद्धीने केली आहे.
कोकणात एक म्हण प्रचलित आहे की, आजोबांनी झाड लावायचे अन् नातवाने आंबे काढायचे, एकूणच, हीच म्हण उल्हास पिंपुटकर यांनी मागे टाकली असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिवाय त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचे विशेष कौतुक केले जात आहे.