(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी येथे मोकळ्या जागेत पार्क केलेला डंपर अज्ञाताने लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना रविवार १४ मे रोजी रात्री ८.३० ते सोमवार १५ मे रोजी सकाळी ७ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत ट्रक मालकाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, त्यांनी रविवारी रात्री आपला डंपर (एमएच ०८ एपी – २७६४) निवळी इसार पेट्रोल – पंपाच्या मोकळ्या जागेत पार्क करुन ठेवलेला होता. सोमवारी सकाळी ७ वा. सुमारास ते डंपर पार्क करुन ठेवलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना आपला डंपर दिसून आला नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेऊन सकाळी १० वा. ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.