(नवी दिल्ली)
तब्बल ६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून नासाचे कॅप्सुल पृथ्वीवर आले आहेत. २४ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता एक कॅप्सुल अमेरिकेच्या उटाहतील ग्रेट सॉल्ट लेक वाळवंटात आले. उल्कापिंडावरील माती घेऊन हे कॅप्सूल पृथ्वीवर उतरले. हे उल्कापिंड आजपासून १५९ वर्षांनी म्हणजे २१८२ साली पृथ्वीवर पडणार असल्याचे सांगितले जाते. याला शास्त्रज्ञांनी बेनू असे नाव दिले आहे. अंतराळात सात वर्षे घालविल्यानंतर अंतराळातील काही सॅम्पल्स लघुग्रहाच्या माध्यमातून गोळा करत परत पृथ्वीवर यशस्वीरित्या उतरल्याची माहिती नासा या अंतराळ संशोधन संस्थेने दिली.
Live Now: #OSIRISREx delivers the US's first pristine asteroid sample after a 3.86 billion-mile journey. Watch landing live from @DeptOfDefense's Utah Test & Training Range. Use #AskNASA to send us your questions. https://t.co/biS33u6RtP
— NASA (@NASA) September 24, 2023
उल्कापिंडाची पृथ्वीवर टक्कर झाल्यास मोठा विनाश होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच नासाने ओसिरिस-रेक्स मोहीम आखली होती. उल्कापिंड किती मजबूत आहे, हे कळण्यासाठी एका यानाला त्यावरील मातीचे नमुने मिळवण्यासाठी अवकाशात पाठवण्यात आले होते. मातीचे नमुने घेऊन कॅप्सूल पृथ्वीवर आले आहे. उल्कापिंडाला अवकाशातच मिसाईलने उडवण्याची नासाची योजना आहे. त्यामुळेच हा खटाटोप करण्यात आला.
कॅप्सूल छोट्या फ्रिजच्या आकाराचे आहे. अशाप्रकारची ही पहिली मोहीम होती, जिथे एका उल्कापिंडावरील मातीचे नमुने आणण्यासाठी यान पाठवण्यात आले होते. ४५ किलोच्या कॅप्सूलमध्ये २५० ग्रॅम मातीचा नमुना आहे. हायपरसोनिक गतीने हे कॅप्सूल पुथ्वीच्या वातावरणात दाखल झाले. यावर हिटशिल्ड लावण्यात आले होते. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना कॅप्सूलची गती आवाजाच्या गतीपेक्षा ३६ पटींनी जास्त होती. नासाच्या टीमने हे कॅप्सूल ताब्यात घेतले आहे. आता त्यावर पुढील संशोधन केले जाईल.
After a journey of nearly 3.9 billion miles, the #OSIRISREx asteroid sample return capsule is back on Earth. Teams perform the initial safety assessment—the first persons to come into contact with this hardware since it was on the other side of the solar system. pic.twitter.com/KVDWiovago
— NASA (@NASA) September 24, 2023