(नाणीज / वार्ताहर)
नाणीज येथे धावजेश्वर चषक ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व चुरशीने सुरू आहेत. त्याचे उदघाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत याच्या हस्ते झाले. याच सोहळ्यात त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नवतरुण मित्र मंडळ नाणीजच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतशबाजीत किरण सामंत यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विनोद भागवत, बाबुशेठ म्हाप, गौरव संसारे, संजय कांबळे, पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम खावडकर, सदस्य विनायक शिवगण, राजन बोडेकर, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, रमेश कोकरे, प्रवीण खटकुळ, दिलीप भागवत, हेमंत हेगिष्टे, शैलेश कामेरकर, पालीचे माजी सरपंच पिंट्या देसाई, प्रसाद रावराणे, अमर कोलते, यांच्यासहित मंडळाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र दर्डी यांनी केले.
याप्रसंगी उद्योजक किरणशेठ सामंत म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुविधा नसताना चांगल्या पद्धतीने खेळ खेळले जातात. या गुणी खेळाडूंच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. तर बाबूशेठ म्हाप म्हणाले, खेळाडूंनी खेळात जर सातत्य ठेवले तर चांगला खेळ होऊ शकतो.
सन्मानपत्र दिल्यानंतर पाहुण्यांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. टॉस उडवून किरण सामंत थोडा वेळ क्रिकेट खेळले. यावेळी नाणीज येथील व तालुक्यातील अनेक क्रिकेट प्रेमी, खेळाडू उपस्थित होते. या निमित्ताने गुरवाडीतील आंब्याचा माळावर क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी विनोद भागवत यांनी प्रस्ताविक केले. श्री.भैया सामंत सदैव आपल्या मंडळाच्या पाठीमागे उभे असतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.