“2023 हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल का करत आहेत, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार. कुणाला धक्का न लावता देणार याचा अर्थ ५०% च्या वर देणार, पण यापूर्वी दोनदा असे आरक्षण टिकलेले नाही, मग नेमके आरक्षण देणार कसे ? टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय ? हे सरकारने स्पष्ट करावे. किमान येत्या वर्षाच्या सुरूवातीला तरी आपल्या संघर्षाला यश मिळेल अशी अपेक्षा मराठा समाज बाळगून आहे. त्यामुळे केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही !”
२०२३ हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 1, 2024