( वेळणेश्वर / उमेश शिंदे)
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, सर्वांचे लाडके नेतृत्व कार्यसंम्राट, कर्तव्यदक्ष आमदार भास्करशेठ जाधव यांनी त्यांच्या आमदार निधीतून सदर सभागृहाला रू. ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला होता. या निधीतून भव्य दिव्य असे सुंदर सभागृह साखरी आगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे.
वास्तविक या नुतन वास्तुचे उद्घाटन करण्यासाठी आमदार श्री भास्करशेठ जाधव स्वतः येणार होते. परंतु सद्या आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्राताई ठाकूर यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उद्घाटन करण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे सौ. पूनम पास्टे, श्री. सिताराम ठोंबरे, वेळणेश्वर जि प गटाचे उपतालुकाप्रमुख विलासराव वाघे , सौ. जोत्स्ना कातालकर, ग्रामपंचायत साखरी आगरच्या सरपंच सौ. दुर्वा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
सदर प्रसंगी वेळणेश्वर चे सरपंच चैतन्य धोपावकर, उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर, हेदवीच्या सरपंच सौ. आर्या मोरे तसेच ग्रामसेवक अनंत गावणंग, संदिप गोरिवले, सौ. प्रियांका ठीक, विठोबा फणसकर हे निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
तसेच अनंत माईन, विलास कदम, विकास कदम, रामचंद्र तेरेकर, श्रीमती सत्यवती घाणेकर, सौ. अश्विनी नाचरे, विकास कदम, विजय भुते, सुभाष अडूरकर, श्रीकांत येतोस्कर, संजीवनी मांडवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार अंजनवाडी ग्रामस्थ स्त्री-पुरुष मंडळींनी यापुढे आम्ही आमदार भास्करराव जाधव यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहू असेही सांगितले. भास्करराव जाधव आणि विकी दादा यांच्या अनुपस्थितीत उद्घाटक नेत्राताई ठाकूर यांनी सर्वांना संबोधित करून अंजनवाडी ग्रामस्थांचे आभार मानले.
या छोट्याखानी कार्यकमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र कदम यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार मानून सुरेश कदम यांनी समारोप केला.
(फोटो छाया : उमेश शिंदे, वेळणेश्वर)