(गुहागर)
नरवण (ता. गुहागर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाचे बचाव पथकाने सुखरूप बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात सोडले.
नरवण सुतारवाडी येथील उपेंद्र नादूसकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल राजश्री कीर व कर्मचारी वनविभागाच्या बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात विहिरीमध्ये लोखंडी पिंजरा टाकण्यात आला. काही कालावधीत बिबट्या पिंजऱ्यात आल्यानंतर त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले. विहिरीमधून बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
बिबट्यांची तब्येत चांगली असल्याचे समजल्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. मादी असून तिचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे आहे. हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, चिपळूण संतोष परशेट्ये, राजाराम शिंदे, राहूल गुंठे, संजय दुडंगे, अरविंद मांडवकर वनरक्षक रानवी यांनी बिबट्याला पोलीस कर्मचारी पोलिस पाटील नरवण, स्थानिक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.