(ठाणे / उदय दणदणे)
कोकणात लोकप्रिय असलेली लोककला “कोकणचे खेळे व नमन” पाहण्यासाठी कोकणी चाकरमान्यांची मुंबईतील नाट्यगृहात तुफान गर्दी होत असते. नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत संलग्न गुहागर तालुका शाखेचे उपाध्यक्ष – शाहीर विनोद फटकरे निर्मित-काळेश्वरी नाट्य नमन मंडळ (मुबंई) मढाळ-गुहागर यांचे कोकणसह मुंबई रंगमंचावर लोकप्रिय ठरलेलं स्त्री -पात्रांनी नटलेलं “नमन” सलग ११ वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत कार्यक्रमाचे आयोजन करत असून या मोसमातील शुभारंभ प्रयोग मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रौ -०८- १५ वाजता मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह (विलेपार्ले) मुंबई येथे होणार आहे.
पारंपारिक गण, सुरेख नृत्य आणि विनोदाने नटलेली परिपूर्ण गौळण आणि लक्ष्मी बालाजींची विशेष कथा व प्रदीप रेवाळे लिखित -दिग्दर्शित: वगनाट्य “पोशिंदा” या सामजिक विषयावर आधारित काल्पनिक ज्वलंत वगनाट्य सादरीकरण होणार आहे. अशा विविध कला रंगतेने सजलेला कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध होत असून निर्माता – शाहीर विनोद फटकरे, शाहीर मधुकर यादव लेखक -प्रदीप रेवाळे, सूत्रधार , ढोलकीपट्टु , मृदुंगमणी – विलास बुदर, गौळण संवाद / नृत्य दिग्दर्शक – गणेश पुजारी, सहकारी योगेश घाणेकर संगीत – संदेश आंबेकर, संदेश गोताड गितकार – शाहीर प्रकाश पांजणे, विलास बुदर, संदेश आंबेकर पार्श्वगायक – शाहीर: प्रकाश पांजणे, अमर फटकरे, योगेश गावणंग पार्श्वगायिका – हेमा लोहार , आरती वीर , तृप्ती बोबले आयोजन सहकार्य-शाहीर दामोदर गोरीवले नियोजन आणि प्रसिध्दी – अमर फटकरे अश्या सर्व कलाकारांच्या सहकार्याने अवघ्या कोकण कला विश्वात लक्ष लागून राहिलेला “पोशिंदा” वगनाट्य प्रयोग सादरीकरण होणार असून तमाम कलाप्रेमींनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड भारत सलग्न तालुका गुहागर शाखेचे अध्यक्ष- सुधाकर मास्कर आणि सर्व मुबंई /ग्रामीण कार्यकारणी पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाला रसिकांनी नाट्यगृहात जाताना आपण आपल्या कोकणच्या संस्कृतीची शान मान ठेवत आपली नवी ओळख नाट्यगृह व्यवस्थापनाला करून द्यावी. आपण सुध्दा शिक्षित व सुजान नागरीक आहोत ही ओळख जगा समोर जाऊ द्या. त्यामुळे सर्व रसिकांना हात जोडून विनंती की अशोभनीय वर्तन, अथवा चुकीच्या कमेंट, आरडाओरडा हुलडबाजी, आयोजक, निर्माते, कलाकार यांना त्रासदायक ठरतील असे कोणतेही वर्तन आपल्या कडून होऊ नये. आपण ज्या पद्धतीने नाटक बघायला जातो त्याच पध्दतीने आपल्या कोकणातील लोककलांचा व लोककलावतांचा आदर करत मानसन्मान वाढविण्यासाठी नमन लोककला संस्था, कार्यक्षेत्र अखंड भारत या संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष-रविंद्र मटकर, तसेच शाहिद खेरटकर, सुधाकर मास्कर, सतीश जोशी, संदिप कानसे, प्रशांत भेकरे, तुषार पंदेरे, रमाकांत जावळे आणि उदय दणदणे व सहकारी यांनी केले आहे.