(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे हायस्कूलमधील ६ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षाखालील १०० मीटर हर्डल्स स्पर्धेत कु. प्रतिक अंकुश रेवाळे याने प्रथम क्रमांक पटकावला. तरआर्यन चंद्रकांत घवाळी या खेळाडूने द्वितीय क्रमांक संपादन केला. ३ किमी वॉकिंग स्पर्धेत या विद्यालयातील कु.जान्हवी जगदीश लोगडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, १५०० मीटर धावणे स्पर्धेत कु. आर्यन चद्रकांत गोताड ने द्वितीय क्रमांक मिळविला. तर ८०० मीटर धावणे- या क्रीडा प्रकारात कु. जान्हवी जगदीश लोगडे द्वितीय आली. तसेच थाळीफेक मैदानी स्पर्धेत कु.आर्यन सुधाकर पवार तालुक्यात प्रथम आला. या खेळाडूंची खरवते चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक दत्तात्रय गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तर मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे उचित प्रोत्साहन लाभले. या सर्व खेळाडूंनी रत्नागिरी तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.