सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि लष्कराचे जवान ट्रेनच्या डब्याला धक्का देताना दिसत आहेत. सर्वांनी मिळून ट्रेन सुरू केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, या घटनेमागचे सत्य आता समोर आले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस आणि काही रेल्वे कर्मचारी मिळून ट्रेनला धक्का देत आहेत. प्रत्येकजण ज्या दिशेने ट्रेनला आधी ढकलताना दिसतात, मात्र त्या दिशेने ट्रेन थोडीही पुढे सरकत नाही. मग सगळे जवान मिळून ट्रेनला विरुद्ध दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करतात अन थोड्याच वेळात ट्रेन हळूहळू पुढे सरकू लागते.
राजस्थान काँग्रेसच्या सरचिटणीस विनीता जैन यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, “नव्या भारतात ट्रेन चालू करण्याची नवी पद्धत”
New India में Train Start करने की Ninja Technique pic.twitter.com/RcLH3dx1ma
— विनीता जैन (@Vinita_Jain7) July 10, 2023
या व्हायरल व्हिडिओबाबत दक्षिण मध्य रेल्वेने ट्विट केले आहे. हा व्हिडिओ ७ जुलैचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी ट्रेन १२७०३ हावडा-सिकंदराबाद एक्सप्रेस आहे. ट्रेनच्या एका भागाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले पोलीस, लष्कराचे जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेनचा एक भाग ढकलून आग लागलेल्या भागापासून वेगळा केला, अशी माहिती देण्यात आली.
Clarification:
This relates to Tr No 12703 (HWH-SC) fire incident on 07.07.23
The video is about conscious decision by Rly Personnel & Local Police to detach the rear coaches to avoid further spread of fire.
It was an emergency action taken without waiting for help from engine https://t.co/vvH3FAWgDP
— South Central Railway (@SCRailwayIndia) July 10, 2023