(नवी दिल्ली)
देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी प्रसिद्ध झाली असून या यादीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. नुकताच एडीआर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात आणि नॅशनल इलेक्शन वॉचनं एनईडब्ल्यू देशभरातील चार हजारपेक्षा अधिक आमदारांच्या संपत्तीचं विश्लेषण करुन आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे 12 आमदार हे एकट्या कर्नाटकातील आहेत.
जगातील श्रीमंत आमदार
डीके शिवकुमार कर्नाटक एकूण मालमत्ता : रु. 1,413 कोटी
केएच पुट्टास्वामी गौडा कर्नाटक एकूण मालमत्ता: रु. 1,267 कोटी
प्रियकृष्ण कर्नाटक – एकूण मालमत्ता: रु. 1,156 कोटी
एन चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश एकूण मालमत्ता: 668 कोटी रुपये
जयंतीभाई सोमाभाई पटेल गुजरात – एकूण मालमत्ता: 661 कोटी रुपये
सुरेशा बीएस कर्नाटक – एकूण मालमत्ता: रु. 648 कोटी
वायएस जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेश – एकूण मालमत्ता: रु 510 कोटी
पराग शहा महाराष्ट्र – एकूण मालमत्ता: रु 500 कोटी
टी.एस. बाबा अंबिकापूर, छत्तीसगड एकूण मालमत्ता – रु 500 कोटी
मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र 2019 एकूण मालमत्ता – 441 कोटी रुपये
हे आहेत देशातील सर्वात गरीब आमदार
28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4001 विद्यमान आमदारांचा समावेश असलेला हा अहवाल आहे. या अहवालानुसार, पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघातील निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार आहेत ज्यांची संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. निर्मल कुमार हे भाजपचे आमदार आहेत. 2021 मध्ये ते टीएमसीच्या गढ सिंधू जागेवरून टीएमसी उमेदवार रुणू मेटे यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आले आहेत.