(पंढरपूर)
आज कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा पहाटे संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला. पहाटे 2:20 मिनिटांनी ही पूजा सुरु झाली. 3:25 मिनिटांनी ही पूजा समाप्त झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी सुखी व्हावा. आज शेतीवर संकट आहे. अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर यसह आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत . या सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद द्यावी, असं साकडं देवेंद्र फडणवीस यांनी विठूरायाकडे घातलं.
आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात भाविकांनी गर्दी केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मानदुमला गावच्या बबन घुगे आणि सौ. वत्सला घुगे यांना मिळाला. मागच्या 15 वर्षापासून हे दाम्पत्य कार्तिक यात्रा करत आहेत. आज विठूरायाची महापूजा करण्याचा मान मिळाल्याने भरून पावल्याची भावना घुगे दाम्पत्याची होती. सर्वांना सुखी ठेव. राज्यातील शेतकऱ्यांला सुखी ठेव, अशी प्रार्थना, त्यांनी केली.