(देवरुख)
घोडवली स्टॉपवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7.15 वा. च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलकंठ वासुदेव लाड (40, तुळसणी, राउळवाडी) हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरुन तुळसणी ते रत्नागिरी असे प्रवास करत होते. घोडवली बस स्टॉप ते 400 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु होते. या ठिकाणी आल्यावर रस्त्यावरील खडीवरुन दुचाकी घसरल्याने मागच्या सीटवर बसलेल्या पत्नी निर्जरा लाड (35) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती निलकंठ वासुदेव लाड यांच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कूलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.