( देवरुख / प्रतिनिधी )
नजीकच्या किरदाडी येथे एकाच शुक्रवारी विहिरीत १० डुक्कर मृतावस्थेत आढळले आहेत. या सर्व डुक्करांना बाहेर काढून त्यांचे दफन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी संजय पेडणेकर यांच्या विहीतून वास येत असल्याचे लक्षात आले. यानुसार विहिरीत पाहिले असता, विहित डुक्करांचा कळपच मृतावस्थेत दिसून आला. यानुसार ही बाब वनविभागाला कळीत करण्यात आली. वनपाल तौफीक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अरुण माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासणीत हे डुक्कर कळपाने जात असताना विहिरीत पडून पाच दिवसांपुर्वीच मृत झाल्याचे निष्पन्न झाले. ते कुजलेल्या स्थितीत होते. या सर्व मृत दहा डुक्करांचे शव ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून त्यांचे दफन करण्यात आले. दरम्यान डुक्कर हे कळपाने व पुढील डुक्कराच्या पाठीमागे जात असतात अशाच प्रकारे पहिला डुक्कर विहिरीत पडताच अन्य ९ डुक्करही विहिरीत पडले असे तपासात स्पष्ट झाले आहे.