(संगमेश्वर / प्रतिनिधी)
घरफोडी करून तांब्या पितळेची भांडी चोरून नेल्याची घटना करंबेळे – फौजदारवाडी (ता. संगमेश्वर) येथे घडली आहे. याबाबत देवरूख पोलिस स्थानकात रविवारी (२३ जुलै) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद संजय महाडिक यांनी दिली आहे. महाडिक हे १ जुलै ते २३ जुलै कालावधीत कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घराची कौले काढून घरात प्रवेश करून घरातील तांब्या पितळेची सुमारे २४ हजार रुपये किमतीची भांडी लांबविली आहेत. घरातील कपाटही फोडून विस्कटून टाकत चोरट्याने किमती ऐवज शोधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. महाडिक हे २३ रोजी घरी आले असता ही चोरी झाल्याचे उघड झाली.
देवरूखचे पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पवार, हेडकॉन्स्टेबल संदीप जाधव, कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सोमवारी (२४ जुलै) ठसे तज्ज्ञ व श्वानपथक दाखल झाले होते. मात्र, हे श्वान तिथेच घुटमळत राहिले. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक डी. एस. पवार करीत आहे.