(रत्नागिरी)
दृष्टिहीन बांधव श्री अरूण पवार, रेल भागाडी यांना मागील 16 वर्षापासून काहीही दिसत नाही. मात्र अनेक वर्षे ते शासनाच्या योजनेपासून व उपचारांपासून दाखला नसल्यामुळे व पुरेशी माहिती व मदत करणारे जवळचे कोणीही नसल्यामुळे वंचित राहिले होते. त्यांना शुक्रवार दि 5 जानेवारी रोजी शिवआरोग्य सेना जिल्हा सहसमन्वय श्री. शशिकांत चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे नेऊन एकाच दिवसात 100% अंधत्वचा दाखला मिळवुन दिला. त्याच प्रकारे कु. समृद्धी प्रशांत मोरे, मु. अस्तान ता. खेड हिला देखील दोन्ही पायाने अपंग असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. घरची परिस्थिती देखील अडचणीची असल्याने तिला देखील अपंगत्वाचा दाखला व ऑपरेशन करण्यासंदर्भात डॉ. देवकर (सिव्हिल रुग्णालय) यांच्याकडून तपासणी करून पुढील शस्त्रक्रियेसाठी नियोजन करून घेण्याचे सामाजिक काम श्री. शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
तसेच अपंग बांधव श्री वसंत पवार यांना व्यवसाय करण्यासाठी थ्री व्हीलर सायकल मिळावी म्हणुन म्हणुन प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. या कामी रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची फार मोलाची मदत व सहकार्य लाभल्याने श्री चव्हाण यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.