(संगमेश्वर)
संगमेश्वर येथील अशोक शेट्ये यांच्या नातवाने सुपाशू विजयानंद शेट्ये याने दिवाळीच्या सुटीत मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती आपल्या घरी तयार केली आहे. यासाठी आजोबांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचा इतिहास ज्वलंत ठेवणारे गड किल्ले आमची शान व अभिमान असुन स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराज व अठरा पगड जातींच्या शूरवीरांनी केलेल्या पराक्रमांची साक्ष देणारे हे किल्ले दिवाळीत घरी बनवून त्याची सजावट करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी कायम आहे. स्वराज्याप्रति प्रेमभावना व या ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक व्हावी त्यांचे सुशोभीकरण व्हावे, असे अशोक शेट्ये यांनी सांगितले.
सुपाशू याने थर्माकोल, कलर, दगडापासून बनविलेला पमुरुड जंजिरा गड किल्ल्याची लहान प्रतिकृती तयार केली आहे. यात पमुरुड जंजिरा गडाचा महादरवाजा, टेहळणी बुरुज, किल्ल्याच्या आतील तलाव, तसेच गडावर भगवे झेंडे, रंगीबीरंगी बल्बांनी केलेली रोषणाई तसेच लावलेली हिरवीगार झाडीने संगमेश्वरकरांचे लक्ष वेधत असून अनेकांनी शेट्ये यांचे घर गाठून ही प्रतिकृती पाहित आहे.
किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यासाठी सुपाशुच्या बरोबरीने साऊ, चिनू, शुवम, गुरुराज, अन्वय, आर्यन, ऋग्वेद, आयुष, कृष्णा, कुणाल, अरुण, अमेय, नीरज, यश, शर्वरी, स्पूर्ती, सांची, स्वानंदी, श्रावणीसह आदींनी सहभाग घेतला.