(नवी दिल्ली)
खाद्यतेलाच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. परदेशातील बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे तसेच सणांच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते परदेशातील बाजारातील मजबूत कल आणि वाढती मागणी यामुळे दिल्लीत तेल तेलबिया बाजारात जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.
दिवाळीचा सण जवळ आल्याने खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. आता मोहरीचा भाव ५,४५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्यामुळे भविष्यात तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना प्रतिलिटर २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.