(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दारूच्या वेसनाच्या नशेत माणूस काय करेल सांगता येत नाही. रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील वृद्धाने दारूच्या नशेत दम्याच्या गोळ्या घेतल्याने जीव आपला गमवावा लागला आहे. अब्दुल अजीज इब्राहिम मुल्ला (65, साखरतर रत्नागिरी) मृत झालेल्या वृद्धाचे नाव आह़े. त्यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 31 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल मुल्ला दारूच्या नशेत दम्याच्या गोळ्यांचे सेवन केल्याने त्यांना चक्कर आली. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.