(संगलट / इक्बाल जमादार)
दापोली येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी व पशूसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद लोंढे यांचा सुपूत्र हेरंब मुकद लोंढे हा नॅशनल लेवल सायन्स ऑलीम्पीयाड २०२३-२४ परिक्षेत देशात दुसरा आल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेरंब लोंढेने दापोलीचे नाव देशाचा नकाशावर नेले असून त्याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळाले आहे. ही परिक्षा आय.आय.टी, जी, नीट, सी.ए.टी., जी.एम.ए.टी., नागरी सेवा परिक्षा इत्यादी स्पर्धात्मक परिक्षेसाठी तयारीचा एक भाग आहे. त्याचे आईवडिल दापोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत आहेत. वडिल डॉ. मुकुंद लोंढे व आई डॉ. सौ. रेणू लोंढे यांचा हेरंब मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.