दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलीसांनी चोख केलं आहे. या प्रकरणी 10 आरोपींना अटक केली आहे.
दापोली पोलीस दिलेल्या माहितीनूसार शिवाजी गशनगर भौंजाळी येथील अमित मधूकर रहाटे (वय 28 रा. शिवाजीनगर भौंजाळी, ता.दापोली) याने सिंगल नळीच्या 16 बंदूका विनापरवाना न्हानू पेंडूरकर (रा.पेंडूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) याच्याकडून खरेदी केल्या होत्या. त्या बंदूका त्याने विविध भागातील व्यक्तींना विकल्या. याचा संपूर्ण छडाच दापोली पोलीसांनी लावला आहे.
याप्रकरणी अमित मधुकर रहाटे (रा. भोगाळी दापोली), सौरभ राजेंद्र म्हद्रसकर (रा. मौजे दापोली), अभिषेक सुधाकर जाधव (रा.जालगाव), सौरभ सुरेश घवाळी (रा.जालगाव लष्करवाडी), विजय नथुराम आंबेडे (रा. मौजे दापोली), नरेश केशव साळवी (रा. करंजाणी दापोली), विश्वास वसंत कानसे (रा. मौजे दापोली), निलेश विलास काताळकर (रा.खेडी दापोली), प्रशांत प्रकाश पवार (रा. माथेगुजर), अनंत धोंडु मोहिते (रा. कोळबांद्रे) दापोली यांना दापोली पोलीसांनी अटक केली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे व टिमने छापा घालून आरोपींना ताब्यात घेतलं. या गुन्हयाचा तपास पोउनि निनाद कांबळे हे करीत आहेत. बंदुका व आरोपी यास ताब्यात घेणे कामी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमनं उत्तम कामगारी केली. याचा तपास सपोनि / पुजा बक्षी या करीत आहेत. भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी आणखी कोणा कोणाचा हात आहे याचा पोलीस तपास करत आहेत.