(इक्बाल जमादार/खेड)
दापोली तालुक्यातील खोंडा येथून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे तक्रार येथील पोलीस स्थानकात मुलीच्या आईने दाखल केली आहे. ही घटना शुक्रवार 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोंडा येथील इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, तिला फुस लावून पळवून नेण्यात आले आहे अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक शीतल पाटील करत आहेत.