(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
जागतिक मल्लखांब दिनाचे औचित्य साधून दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन व सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मल्लखांब प्रात्यक्षिक व गणवेश वाटप हा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील मळेकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच ऐश्वर्या धाडवे यांनी पुरस्कृत केलेल्या गणवेशाचे उपस्थित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिके देखील सादर केली. या कार्यक्रमात बोलताना दापोली तालुका मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार यांनी दापोली शहरात लवकरच कायमस्वरूपी मल्लखांब प्रशिक्षण केंद्र उभे राहील अशी घोषणा केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर विलणकर यांनी केले.
या कार्यक्रमाला दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनचे कार्याध्यक्ष मंगेश राणे, सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघाचे अध्यक्ष सुनील आंबूर्ले, बारावाडी अध्यक्ष अविनाश निवाते, पंचक्रोशी अध्यक्ष अंकुश बंगाल, एकता विचार मंचाचे अध्यक्ष भालचंद्र मुसलोणकर, दिलीप गायकवाड, गजाभाऊ जाधव, परेश वडके, प्रभाकर कदम, रवी मेहेंदळे, सोमनाथ गुरव, सखाराम मळेकर, सचिन गोवळकर, दिलीप बांद्रे, जनार्दन पावसे, अश्विनी राणे, रश्मी वडके, पुनम कुलाबकर, सोनी पटवा, रत्नप्रभा हवालदार, गुडिया राजभर, गौरव राणे, निकेत बांद्रे, श्रुती गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो : दापोली तालुक्यातील हर्णे येथे जागतिक मल्लखांब दिनानिमित्त गणवेशाचे वाटप करताना मान्यवर