(दापोली)
दापोली तालुक्यातील शिवाजीनगर येथे ८७ वर्षीय वृद्धेने आजारपणाला कंटाळून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रभावती खानविलकर (87) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धेच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना सोमवार २६ सप्टेंबर रोजी रात्री १.१५ च्या दरम्यान घडली. प्रभावती खानविलकर यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते . उपचार सुरू असताना २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४५ च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
खानविलकर या नियमित आजारी असायच्या. शेवटी आजारपणाला कंटाळून रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. भाजलेल्या अवस्थेत त्यांचा मुलगा सुरेश खानविलकर यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक नलावडे करीत आहेत .