(मुंबई / प्रतिनिधी )
देवगडचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार, दर्यावर्दीचे संपादक अमोल सरतांडेल यांची सुकन्या सौ. श्रद्धा निलेश तोरसकर पूर्वाश्रमीच्या (श्रध्दा अमोल सरतांडेल ) यांचे वयाच्या 34 व्या वर्षी गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी मुलुंड येथे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दर्यावर्दी मासिकाचे संपादक अमोल सरतांडेल यांची श्रद्धा या द्वितीय कन्या होत. मुलुंड पूर्वेच्या टाटा कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रद्धाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने सरतांडेल परिवाराला मोठा धक्काच बसला.
नेहमी स्मितहास्य असणाऱ्या श्रद्धाचा स्वभाव हा मनमिळावू व हळवा होता. वेळोप्रसंगी रंजल्या गांजलेल्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना मोलाची साथ देत असत.
समाजासाठी त्या आदर्श व्यक्ती होत्या. स्मशानभूमीत मुखाग्नी दिल्यानंतर अनेकांनी शोकभावना व्यक्त करुन आदरांजली वाहिली. यावेळी सर्व अनेक समाज बांधवांनी त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.