(बंगळुरू)
चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरने लगेचच काम सुरू केले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याआधीचे क्षण खास होते. तो क्षण इमेजर कॅमे-याने चंद्रावर उतरण्याआधी व्हिडीओ शूट केला. तो व्हीडीओ इस्रोने जारी केला. लँंडर आणि रोव्हरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. विक्रम लँडर मॉड्यूलवरील आयएलएसए, रांभा आणि चासेट ही उपकरणे आज सुरु करण्यात आली, अशी माहिती इस्रोने दिली. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खनिजे, तेथील वातावरण आणि भूकंपासंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, विक्रम लँडरमधून बाहेर आलेल्या प्रज्ञान रोव्हरच्या हालचालीबाबत इस्रोने माहिती द्यायला सुरुवात केली आहे. रोव्हर लँडरमधून बाहेर आल्यावर त्याने आपले काम करण्यास सुरुवात केली. इस्रोकडून चांद्रयान-३ मोहिमेची माहिती वेळोवेळी दिली जात आहे. इस्रोने संध्याकाळी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्याआधीचा व्हिडीओ चित्रित केला. त्याची व्हिडीओ क्लिप इस्रोने जारी केली.
भारताची चांद्रयान मोहीम १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्राला गवसणी घालण्यासाठी मार्गस्थ झाली होती. जवळवास ४१ दिवसांच्या प्रवासानंतर २३ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झालं. मात्र चांद्रयानाच्या लँडिंगची शेवटचे काही क्षण खूप उत्कंठावर्धक होती. विशेषतः शेवटची १७ मिनिटं खूप महत्त्वाची होती. त्यातील लँडिग आधी शेवटच्या दोन मिनिटांचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. चांद्रयान-३ चंद्रावर पोहोण्यापूर्वीची शेवटची १७ मिनिटे फार गुंतागुंतीची होती. कारण तोच महत्वाचा टप्पा होता. या महत्वांच्या व गुंतागुतींच्या प्रक्रियेत यानाची गती कमी करणे व सर्व सेंसर व्यवस्थित सक्रीय ठेवणे आव्हानात्मक काम होता. या कठीण परीक्षेत पास होत यायानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं.
Chandrayaan-3 Mission:
All activities are on schedule.
All systems are normal.🔸Lander Module payloads ILSA, RAMBHA and ChaSTE are turned ON today.
🔸Rover mobility operations have commenced.
🔸SHAPE payload on the Propulsion Module was turned ON on Sunday.
— ISRO (@isro) August 24, 2023
चंद्राभोवती प्रदक्षिणा मारणा-या प्रोपल्शनमधील शेप उपकरण रविवारी सुरु करण्यात येणार आहे. चांद्रयान-३ चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. त्यामधून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन भाग वेगळे झाले. प्रज्ञान रोव्हरही कामाला लागले असून, ते चंद्रावरील पाणी शोधणार आहे. तसेच तेथील विविध फोटो आणि माहिती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम १४ दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल, ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे.
‘विक्रम’ च्या यशस्वी लँडिंगनंतर त्यामधील २६ किलो वजनाचा ‘प्रज्ञान’ हा रोव्हर चंद्रपृष्ठावर उतरला असून त्याने आपले काम सुरू केले आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माती, वातावरणासोबत खनिजाबाबतची माहिती गोळा करून पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे. अशा ठिकाणावरून डेटा गोळा करणे रोव्हरसाठी ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या खनिजांचे घटक आहेत का, याबाबतही संशोधन होणार आहे. चंद्रावरील शोध हा भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्रावर इतर काही दुर्मिळ खनिजे सापडल्यास त्याचाही मानवाला फायदा होऊ शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.