(सांगली)
तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (२३) या भारतीय सैन्यदलातील जवानाने कर्तव्य बजावत असताना गोळी झाडून आत्महत्या केली. मयूर डोंबाळे हे जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात लष्करी कर्तव्य बजावत होते. दोन वर्षांपूर्वीत सैन्यदलात भरती झालेल्या या जवानाच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील महेश्वर सैन्य शिबिरात मयूर हे कर्तव्यावर होते. तिथेच त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई,वडील,बहीण भाऊ असा परिवार आहे. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले होते. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या भरतीतून मयूर हे सैन्यदलात रुजू झाले होते.