(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात श्रीमान चांदूलाल शेठ हायस्कूल व ज्यू.कॉलेज खेड प्रशालेतील इ.8 वी मधील विराज योगेश तांबट व आदित्य राहुल पांचाळ यांच्या ऑटोमेटिक अप्पर डिप्पर, लाइफ सेव्हर ऐक्सीडेंट कंट्रोलर सेन्सर या वैज्ञानिक प्रतिकृतीचा (मॉडेल ) चा प्रथम क्रमांक आला आहे.
हे प्रदर्शन लोटे येथील कविता विनोद सराफ शाळेत झाला. तालुक्यातील अनेक शाळानी या शिबिरात भाग घेतला होता. विज्ञान विषयाच्या प्रतिकृती करण्यासाठि शिक्षिका श्रीम.सुनिता बेलोसे, श्रीम. आंबेडे, श्रीम.बने, कांबळे व्ही.जी. यानी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.भोळे तसेच शाळेचे चेअरमन ना.बा.शेलार, व्हा.चेअरमन राजेश बुटाला यानी अभिनंदन केले.
फोटो: ऑटोमेटिक अप्पर डिप्पर, लाइफ सेव्हर ऐक्सीडेंट कंट्रोलर सेन्सर या वैज्ञानिक प्रतिकृती सोबत विद्यार्थी व शिक्षिका
(छाया – इक्बाल जमादार, संगलट खेड )