( नवी दिल्ली )
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एका सामाजिक कार्यकर्त्याने डोळस वाट निवडली त्याने त्याच्या आहे. डोळ्यामध्येच भारताचा तिरंगा ध्वज रंगवला आहे. युएमटी राजा असे या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असून तो तमिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यातील कुनियामुथूरचा रहिवासी आहे.
डोळ्यात तिरंगा रंगवतानाचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हीडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. युएमटी राजा लघुचित्रकारही असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत त्यांनी डोळ्यात तिरंगा रंगवण्यास सुरुवात केली. अंड्याच्या कवचातील पांढऱ्या भ्रूणावरील अत्यंत पातळ फिल्मवर तिरंग्याचे लघुचित्र रेखाटण्यात आले असून त्यानंतर डोळ्यावरील पांढऱ्या बुबळावर चिकटवले. यासाठी त्यांनी तासभर मेहनत घेतली. राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी करण्यासाठी त्यांनी डोळ्यामध्ये तिरंगा रंगवला असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओत सांगितले आहे. विशेष म्हणजे युएमटी राजा यांनी त्यांच्या कृतीचे अनुकरण न करण्याचा सल्ला दिला आहे. अशा कृतींमुळे डोळ्यात अॅलर्जी आणि खाज सुटते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे यामुळे संसर्गाचा धोकाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.