(आरोग्य)
डोळे हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा व सर्वात नाजूक भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. डोळ्यांची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. वातावरणातील बदल, प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना वेळेआधीच चष्मा लागतो. इतकंच नाही तर लोकांना सुरुवातीला डोळ्यात पाणी येण्याची, डोळे लाल किंवा कोरडी होण्याची तक्रार जाणवते. परंतु अनेक जण त्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. ऐवढेच नाही तर पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम देखील उद्भवू शकतात.
डोळ्यात पाणी येण्याची अनेक कारणे असू शकतात. केमिकल इफेक्ट, एलर्जी, डोळ्याला काही इजा होणे, डोळे ड्राय असणे, थंडी किंवा उन्हाचा परिणाम अशा अनेक समस्यांचा यात समावेश होतो. परंतु ही समस्या सारखी भासत असेल तर त्याचा इलाज तात्काळ करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वारा आणि हवा यांमुळे डोळ्यांना त्रास होतो, डोळ्यातून पाणी येणे सुरू होते यासाठी काही घरगुती उपाय करू शकतो.
कधीकधी डोळ्यांत पाणी येण्याचे कारण सामान्य असते. खर तर डोळ्यांत धूळ किंवा कचरा गेला की, डोळ्यातून पाणी येते. त्याचबरोबर कोणीतरी कांदा कापत असल्यामुळे देखील कारणीभूत आहे, परंतु हे पाणी थांबत नसेल, तर ते एखाद्या छोट्या आजाराचे लक्षण असू शकते. कधीकधी डोळ्यांत पाणी येण्याचे कारण डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारी जळजळ असू शकते. वास्तविक, हा त्रास एका डोळ्यापासून सुरू होतो आणि दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो. या समस्येचे दोन प्रकार आहेत, एक ऍलर्जी आणि दुसरी व्हायरस. जर असा प्रकार असेल तर आपणाला ताबडतोब डॉक्टरांना भेट द्यावी लागेल. काहीवेळा कॉन्ट्रॅक्ट लेन्स दीर्घकाळ धारण केल्यानेही डोळ्यांत पाणी येते. लेन्स घातल्या तर डोळ्यांत पाणी येण्याबरोबरच जळजळ आणि इतर समस्याही उद्भवू शकतात.
काही वेळा कॉम्प्युटरवर तासंतास काम केल्यामुळे अनेकांना डोळ्यांची समस्या भेडसावत असते, यामुळे डोळ्यातून पाणी येणे ही समस्या खूप कॉमन झाली आहे. परंतु तज्ञांच्या मते ही समस्या असल्यास दुर्लक्ष करू नये कारण या समस्येचे पुढे साईड इफेक्ट संभवू शकतात. कधी कधी डोळ्यातून असे बाहेर पडणारे पाणी हे महत्त्वपूर्ण ही मानले जाते. त्यामुळे डोळ्यातील चिकटपणा या समस्येचे संक्रमण होणे थांबते. परंतु पाणी जास्त निघणे याचा परिणाम तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीवर पडू शकतो. यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधूनही काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता आणि या या समस्येपासून सुटकारा मिळवू शकता.
खारे पाणी किंवा घरी तुम्ही खारे पाणी तयार करु शकता. खाऱ्या पाण्यात मायक्रो बायऑक्साईडचे गुण असतात. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच्या समस्येवर हे मदत करू शकते. कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून तुम्ही सलाइन वॉटर आणून वापरू शकता. किंवा घरीच खाऱ्या पाणी तयार करू शकता आणि या पाण्याने तुमच्या डोळ्यांना वाफ देऊ शकता
टी बॅग
पाणी बाहेर पडण्याऐवजी डोळे सुजत असतील किंवा दुखत असतील तर आपण वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. यादरम्यान तुम्ही टी बॅग ट्राय करू शकता. कारण यामध्ये इन्फ्लामेंट्रीचे गुण असतात. यामुळे तुम्हाला काही वेळासाठी दुखण्यापासून सुटका मिळू शकते. चहा पावडर काही काळासाठी गरम पाण्यात शिजू दिल्यास आणि या पाण्याने डोळ्यांना शेक दिल्यास ही समस्या दूर होते. परंतु यावेळी हे लक्षात ठेवावं की पाणी जास्त गरम होऊ नये.
कच्चा बटाटा
कच्चा बटाट्यामध्ये एन्स्ट्रीजंटचे गुण असतात. ते डोळ्यांच्या समस्याला तात्काळ उपाय सुचवतात. इतकेच नाही तर डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही महिला बटाट्याचा वापर करतात. यासाठी तुम्ही बटाट्याच्या छोट्या छोट्या स्लाईस करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि त्या थंड झाल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती 15 ते 20 मिनिटांचा ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला डोळ्यांना गारवा मिळतो.