रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली आहे. एकूण २१ जागांपैकी १९ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, आता अध्यक्ष निवडीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५ जागा सहकार पॅनेलला मिळाल्या. दोन जागावर अन्य उमेदवार निवडून आले. त्यामुळे २१ पैकी १९ जागांवर वर्चस्व राखत या निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी पुन्हा डॉ. तानाजीराव चोरगे हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले जात आहे. येत्या १ डिसेंबरला अध्यक्ष निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थित हि सभा होणार