साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. अश्यातच अभिनेत्रीचा एक फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
रश्मिकाचा डिपफेक व्हायरल व्हिडिओ रिसर्चर अभिषेकने X वर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती आनंदाने उड्या मारत लिफ्टमध्ये जात असल्याचं दिसत होतं. त्यात तिला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अभिषेकने लिहिले, ‘डीपफेक विरोधात कायदेशीर कारवाई आणि नियम बनवण्याची तात्काळ गरज आहे.
दरम्यान, आता या फेक व्हायरल व्हिडिओवर स्वतः अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “हे शेअर करत असताना मला खरोखर वाईट वाटत आहे. माझ्याबद्दलचा डीप फेक व्हिडिओ ऑनलाइन पसरवला जात आहे. त्याबद्दल मला प्रामाणिकपणे बोलायचे आहे. केवळ माझ्यासाठीच नाही, तर तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जात असल्यामुळे आज खूप हानी होण्यास असुरक्षित असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी हे अत्यंत भीतीदायक आहे. आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून, मी माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांच्याबद्दल आभारी आहे. जे माझे संरक्षण आणि समर्थन करत आहेत;
पण मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत असे काही घडले असेल, तर मी याला कसे सामोरे जाऊ शकले असते, याची मी खरोखर कल्पना करू शकत नाही.आपल्यापैकी अधिक लोकांना अशा ओळख चोरीचा परिणाम होण्याआधी एक समुदाय म्हणून आणि तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे’. असं रश्मिका म्हणाली आहे.
‘ऑल्ट न्यूज’च्या अभिषेक यांनी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ (deepfake video) व्हायरल होऊ लागल्यानंतर ट्विट करत हा व्हिडिओ ट्विट करत प्रकरणाचा वाचा फोडली. त्यांनी हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या ब्रिटीश-भारतीय असलेल्या महिलेचा आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. 9 ऑक्टोबर रोजी तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हाच व्हिडिओ डीपफेक करण्यात आला. झारा पटेल लिफ्टमधून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला Deep Fake तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करण्यात आले असून झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे.
काय आहे Deep Fake
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.
हा व्हिडिओ खरा की खोटा हे ओळखता न आल्याने रश्मिकाचाच व्हिडिओ असे समजून हा व्हिडिओ एक्सवर लाखो लोकांनी पाहिला आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
I feel really hurt to share this and have to talk about the deepfake video of me being spread online.
Something like this is honestly, extremely scary not only for me, but also for each one of us who today is vulnerable to so much harm because of how technology is being misused.…
— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 6, 2023
India seriously need Law on Deep Fake, Just see how it was misused by using face of Rashmika Mandanna
It was extensively used by present regime to spread lies about Opposition leaders
Original 👇 Deep Fake 👇 pic.twitter.com/bVnPBfhvvg
— Veena Jain (@DrJain21) November 6, 2023
🚨 There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.
You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.
This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT
— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023