(संगमेश्वर)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवत संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावच्या पदाधिकारी, गावकरी मंडळी, सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संगमेश्वर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिंडार पडला आहे.
संगमेश्वर तालुक्यात यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढली आहे. डिंगणी गावच्या गावाकऱ्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला त्याचे मी स्वागत करतो. तुमच्या गावातील विकास काम करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी डिंगणीवासियांना दिला. उबाठा मध्ये राहून गावाच्या विकासाचा पत्ता नाही, म्हणून गावाच्या विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आम्ही सर्व गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रवेश केला. आम्हाला पालकमंत्री यांच्यावर विश्वास आहेत आमच्या गावाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील, असे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेशाला किंगमेकर किरण सामंत, अण्णा सामंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप, संगमेश्वर उपतालुका प्रमुख जमूरत अलजी, विभाग प्रमुख महेश देसाई, डिंगणी गावच्या सरपंच समीरा खान, शाखाप्रमुख विशाल कदम, उपशाखाप्रमुख दत्ताराम नितोरे, उपशाखाप्रमुख व तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खाडे, युवा शाखाप्रमुख सचिन राऊत, युवा उपशाखाप्रमुख योगेश खाडे, माजी सरपंच तुकाराम पाकतेकर, गावकर वामन काष्टी, गावकर पांडुरंग पैजे, बौद्धवाडी अध्यक्ष रमेश मोहिते, कार्याध्यक्ष विनायक कदम, रमेश नितोरे, राजेश काष्टे, संतोष काष्टे, पांडुरंग जांभळे, दिनेश काष्टे, बारका काष्टे, शिवराम मुंडेकर, चंद्रकांत गावडे, सिताराम मुंडेकर, बाजी काष्टे, नागचंद्र कदम, दिलीप कदम, नितेश कदम, सुशांत कदम, अर्पित काष्टे, अविनाश मिस्त्री, मंगेश राऊत, मारुती राऊत, अक्षय राऊत, सविता राऊत, संतोष कांबळे, कृष्णा खांबे, राजाराम खांबे, सत्यवती खांबे, अनिता खांबे, सुनिता खांबे, शांताराम खांबे, विश्वनाथ जोगळे, नारायण खांबे, कृष्णा धामसेकर, तुकाराम पाकतेकर, तुकाराम खाडे, दिनकर खाडे, शंकर खाडे, गणपत पाकतेकर, या पक्षामध्ये डीगणी गावातील मुस्लिम समाजानेही प्रवेश केला. यामध्ये सिकंदर मुकादम, फैजमत मापारी,मगबुल खान, रफिक नगरजी,सरफराज मुल्ला,मुजाहिद वागळे,अशपाक मापरी, मुनीर पावसकर, फातिमा फनसोपकर,नूरजान सोलकर,सबीया सोलकर,रियान फकीर, सफिया फकीर, अफसर मिरकर, तंजिमा फकीर, कारामत पावस्कर, जीशान फनसोपकर, मासूम फकीर आमान मापारी, साहिल मापारी, सोहेल सय्यद, निहाल मिरकर सफिर फकीर, आ दी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी जमूरत अलजी, समीरा खान, मुजाहीत वागले गावप्रमुख वामन काष्टे. विशाल कदम, भगवान खाडे दत्ताराम नीतोरे, सचिन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यानी मेहनत घेतली.