(चिपळूण /ओंकार रेळेकर)
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.महेंद्र कदम यांचे मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा.हृदयाच्या तीव्र झटक्याने वयाच्या ५४ व्या वर्षी अकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली पत्नी आणि वडील गंगाराम तानु कदम रा.चिपळूण असा परीवार आहे.
बालवयापासूनच समाजकार्याची आवड असणारे डॉ. महेंद्र गंगाराम कदम यांनी आपल्या शैक्षणिक काळानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मुंबई येथील मालाड विभागातून शिवसेनेचे काम सुरू केले. या काळात महानगरपालिकेतील अनेक लोक हिताची कामे पूर्ण होण्यास त्यांचा मोठा सहभाग होता. मुंबईमधील जुन्या चाळींचे पुनर्वसन आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यामधून त्यांनी पीएचडी करून डॉक्टर पदवी मिळवली होती.
शिवसेना पक्षासह ते अनेक सामाजिक संस्था संघटनांमध्ये सक्रिय होते. तत्कालीन शिवसेना व सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अपार कष्ट करून आपला संसार फुलविला होता. शिवसेना पक्षाविषयी आणि सामाजिक कार्याची आवड होती. त्यामुळे ते गावांतील विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे त्यांचा स्वभाव प्रेमळ व कष्टाळू होता.शांत, संयमी, मनमिळावू स्वभावाने चिपळूणमध्ये आणि मुबई मध्ये सर्वांना परिचित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ते खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत होते.
आशा किरण ट्रस्ट विश्वस्त, समर्थ फाउंडेशन विश्वस्त, गृह पुनर्विकास समन्वय समिती सेना अध्यक्ष या आणि अशा विविध पदांवर ते सक्रिय होते कै .महेंद्र कदम यांचे मुळगाव चिपळूण तालुक्यातील खेर्डी वरचीपेठ हे आहे कौटुंबिक कार्यक्रम सणवार यामध्ये ते चिपळूणमध्ये आपल्या कुटुंबात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यांच्या पश्चात कृ. श्रुती,कृ. तन्वी कृ.अदिती आणि पत्नी श्रीमती स्वप्ना कदम आणि वडील श्री. गंगाराम तानु कदम, चिपळूण असा परीवार आहे. स्वर्गीय डॉ.महेंद्र कदम यांचे सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी टीचर कॉलनी स्मशानभूमी खार मुंबई येथे सातवे कार्य, हरिहरेश्वर येथे गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दहावे कार्य आणि कनकिया पॅरीस एफ् ब्लॉक, रुम नं. ९०१, ए विंग, बांद्रा – कुर्ला कॉम्पलेक्स, संत ज्ञानेश्वर नगर, बांद्रे (पूर्व), मुंबई येथे शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी स.१० वा.बारावे विधी होणार आहे.