( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जादुटोणा करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालाने एका आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुश्ताक इसा काझी (52, ऱा मजगांव रत्नागिरी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आह़े. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून काझी याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले होत़े.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पल्लवी शेषगिरी गोवेकर यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. सरकारी पक्षाकडून ऍड़ प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिल़े. खटल्यातील माहितीनुसार 28 एप्रिल 2016 रोजी विलास शंकर तांबे (वय 21, रा. भावेआडाम-तांबेवाडी, रत्नागिरी) यांच्या घरातील माणसे आजारी पडत होत़ी. बऱ्याच औषधोपचारनंतरही त्यांना गुण येत नव्हत़ा. याबाबत काझी यांनी यासाठी तुमच्या घराचे शुद्धीकरण व देवदेवस्की करावी लागेल अशी बतावणी केल़ी. यासाठी रोख रक्कम 15 हजार चार मंगळसुत्र, चार सोन्याच्या चेन, 2 कानातील कुड्या व साखळी असे सोन्याचे दागिने असा 1 लाख 50 हजार रुयांचे दागीने शुद्धिकरणासाठी घेऊन फसवणूक केली. असा आरोप काझी याच्यावर ठेवण्यात आला होत़ा.
याप्रकरणी विलास तांबे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात काझी याच्याविरूद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी 18 जुलै 2017 भादवी कलम 420, जादुटोणा अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एल. पेढांमकर यांनी केल़ा. पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे पाच साक्षिदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत, सहाय्यक पोलीस फौजदार अनंत जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.