रस्त्यावर आपल्याला विविध रंगाच्या नंबर प्लेट पहायला मिळतात. प्रत्येक वाहनांच्या नंबर प्लेट अशाच वेगवेगळ्या रंगांच्या का असतात म्हणजे त्या प्रत्येक रंगाबरोबर नंबर प्लेटचा वेगवेगळा अर्थ देखील जाणून घ्या…
विविध रंगाच्या नंबर प्लेट
*पांढरी नंबर प्लेट* –
हि नंबर प्लेट सामान्य व्यक्तीसाठी असते -म्हणजे या वाहनांचा वापर व्यापारिक कारणांसाठी केला जाता नाही. यावर काळ्या रंगाचे आकडे असतात. त्यामुळे पांढऱ्यात रंगाची नंबर प्लेट पाहून लोक लगेचच अंदाज बांधतात की गाडी वैयक्तिक कारणासाठी वापरले जाणारे वाहन आहे.
*पिवळी नंबर प्लेट* –
याचा वापर ट्रांसपोर्टच्या वाहनांसाठी केला जातो. – या नंबर प्लेटचा वापर टँक्सी तसेच ट्रक साठी केला जातो ज्या व्यापारिक कारणासाठी वापरल्या जातात. या पिवळ्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे आकडे असतात.
*निळी नंबर प्लेट* –
निळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर अशा वाहनांसाठी केला जातो जी वाहने विदेशी प्रतिनिधीं द्वारे वापरली जातात- यावर पांढऱ्या अक्षरात नंबर असतात
*काळी नंबर प्लेट* –
काळ्या रंगाची नंबर प्लेट सुद्धा कमर्शिअल वाहनांसाठी वापरली जाते – परंतु हि वाहने एखाद्या खास व्यक्तीसाठी असता – अशा काळ्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगात नंबर लिहिलेले असतात.
*तारे असणारी नंबर प्लेट* –
अशा प्रकराच्या वेगळ्या नंबरिंग प्रणालीचा वापर सैन्याच्या वाहनांसाठी केला जातो -या नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर नंबरच्या आधी ब्रॉज एरो असतो -यातील पहिले दोन अंक हे वर्षांना दर्शवतात, ज्या वर्षी सेनेेने ते वाहन खरेदी केले आहे – यात महत्वाचे म्हणजे ही नंबर प्लेट 11 अंकांची देखील असते
*हिरवी नंबर प्लेट* –
रस्ते मंत्रालयाच्या इलेक्ट्रिक परिवहन वाहनांना या रंगाच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात – नंबर प्लेटचा रंग हिरवा असतो आणि त्यातील आकडे वाहनाच्या श्रेणीनुसार पिवळा आणि पांढरा असतो
*लाल नंबर प्लेट* –
जर कोणत्या गाडीवर लाल रंगाची नंबर प्लेट असेल तर ते वाहन भारताच्या राष्ट्रपतींचे किंवा कोणत्यातरी राज्याच्या राज्यपालांचे असते – हे लोक विना लाइसेंस या ऑफिशियल गाड्याचा वापर करु शकतात – तसेच याच्या नंबर प्लेट वर सुवर्ण रंगाचे नंबर असतात.