भारतात प्रत्येक नागरिकाला एकसमान आणि सन्मानजनक वागणूक दिली जाते. तशी भारताची प्रतिमा होती. गरीब देश असूनही भारत आपल्या नागरिकांविषयी सन्मानाने वागणारा देश अशी प्रतिमा होती. आपल्या देशातल्या लोकांना चांगली वागणूक दिली अशी भारताची प्रतिमा आहे. मात्र सध्या या प्रतिमेत काही बदल होत आहेत. “भारताची प्रतिमा जगात अल्पसंख्याक विरोधी अशी तयार झाली तर भारतीय कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा ठरू शकते. भारताची प्रतिमा एकदा अल्पसंख्याक विरोधी अशी तयार झाली तर विदेशातले लोक, तिथलं प्रशासन हे आपल्या राष्ट्रवार विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. असं घडलं तर गुंतवणूकदारही आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणं बंद करू शकतात.” असं म्हणत सावध होण्याचा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अनेकदा देशाच्या आर्थिक स्थितीवर परखडपणे भाष्य केलं आहे.
लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी सोप्या आसतात. त्यात नॅव्हिगेशनची गरज असते. लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडली तर अनेक बदलही करावे लागतात. रशिया आणि चीन यांचं उदाहरण देत म्हटलं की, या देशांमध्ये चेक आणि बॅलन्स नसल्याने त्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे असे टाइम्स नेटवर्कशी बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं आहे.
भारताचे सेवा केंद्र निर्यात हे जागतिक स्तरावर व्यवसायाची संधी म्हणून सुस्थिती आहे. त्याच्या वाढीसाठी, प्रगतीसाठीही भरपूर वाव आहे. पाश्चात्य देशांमधील गोपनियतेचा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यात आक्रमकपणे वाढवणं आवश्यक आहे असंही राजन यांनी म्हटलं आहे.